व्हिडिओ पाहण्यासाठी

सैतान एक खरी व्यक्‍ती आहे का?

सैतान एक खरी व्यक्‍ती आहे का?

बायबलचं उत्तर

 हो, सैतान एक खरी व्यक्‍ती आहे. त्याला एक स्वर्गदूत म्हणून निर्माण करण्यात आलं होतं. पण, नंतर तो दुष्ट बनला आणि त्याने देवाविरुद्ध बंड केलं. बायबलमध्ये त्याला “या जगाचा अधिकारी” म्हटलं आहे. (योहान १४:३०; इफिसकर ६:११, १२) सैतान कशा प्रकारची व्यक्‍ती आहे हे दाखवण्यासाठी बायबलमध्ये त्याच्यासाठी वेगवेगळी नावं आणि शब्द वापरले आहेत. जसं की,

नुसतीच एक कल्पना किंवा वाईटपणा नाही

 काही लोकांना वाटतं, की सैतान एक खरी व्यक्‍ती नसून नुसतीच एक कल्पना किंवा वाईटपणा आहे. पण हे खरं नाही. कारण बायबलमध्ये देव आणि सैतान यांच्यात झालेलं एक संभाषण दिलंय. देव परिपूर्ण आहे. त्यामुळे साहजिकच त्याच्यात कोणताही वाईटपणा नाही. याचाच अर्थ तो सैतान या खऱ्‍या व्यक्‍तीशी बोलत होता. (अनुवाद ३२:४; ईयोब २:१-६) तसंच, येशूसुद्धा परिपूर्ण आहे त्याच्यात कोणतंही पाप किंवा वाईटपणा नाही. पण तो पृथ्वीवर असताना सैतानाने त्याला मोहात पाडायचा प्रयत्न केला. (मत्तय ४:८-१०; १ योहान ३:५) तर बायबलमधल्या या उदाहरणांवरून दिसून येतं, की सैतान नुसतीच एक कल्पना किंवा वाईटपणा नसून एक खरी व्यक्‍ती आहे.

 पण सैतान खरोखर आहे हे बरेच लोक मानत नाहीत, याचं आपल्याला आश्‍चर्य वाटलं पाहिजे का? अजिबात नाही. कारण बायबलमध्ये सांगितलंय की सैतान आपली ध्येयं साध्य करण्यासाठी इतरांची फसवणूक करतो. (२ थेस्सलनीकाकर २:९, १०) तो खूप चलाख आहे. आणि आपण एक खरी व्यक्‍ती नाही असा लोकांनी विचार करावा म्हणून त्याने बऱ्‍याच जणांना एक प्रकारे अंधळं केलंय.​—२ करिंथकर ४:४.

सैतानाबद्दल आणखी काही गैरसमज

 

 खरी माहिती: काही बायबलमध्ये “लूसिफर” असं भाषांतर केलेल्या इब्री भाषेतल्या शब्दाचा अर्थ “तेजस्वी” असा होतो. (यशया १४:१२) या वचनाची मागची-पुढची माहिती पाहिली, तर कळतं की हा शब्द बाबेलच्या राजघराण्याला किंवा राजांना सूचित करण्यासाठी वापरण्यात आलाय. पण देव या गर्विष्ठ राजांना नमवेल असं सांगण्यात आलं होतं. (यशया १४:४, १३-२०) बाबेलच्या राजघराण्याचा पराभव झाल्यावर त्याची थट्टा करण्यासाठी “तेजस्वी” हा शब्द वापरण्यात आला.

 

 खरी माहिती: सैतान देवाचा सेवक नाही, तर त्याचा शत्रू आहे. जे देवाची सेवा करतात त्यांचा तो विरोध करतो आणि त्यांच्यावर खोटे आरोप लावतो.​—१ पेत्र ५:८; प्रकटीकरण १२:१०.