व्हिडिओ पाहण्यासाठी

बायबलमधल्या ठिकाणांचे नकाशे

बायबलमधल्या ठिकाणांचे नकाशे

“उत्तम देश को देख”  या माहितीपत्रकात बायबलमधल्या ठिकाणांचे नकाशे दिले आहेत. तुमचा वैयक्‍तिक बायबल अभ्यास आणखी चांगल्या प्रकारे करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. बायबलमध्ये बऱ्‍याच देशांबद्दल, शहरांबद्दल आणि ठिकाणांबद्दल सांगण्यात आलं आहे. बायबल वाचताना किंवा त्याचा अभ्यास करताना या नकाशांचा वापर केल्यामुळे तुम्हाला बायबलमधल्या घटना नेमक्या कुठे घडल्या होत्या हे पाहता येईल. बायबलमधल्या घटनांवर त्या ठिकाणांच्या भौगोलीक परिस्थितीचा कसा प्रभाव पडला हेही तुम्हाला पाहता येईल.

“उत्तम देश को देख”  या माहितीपत्रकात बायबलमधल्या ठिकाणांचे रंगीबेरंगी नकाशे आणि तक्‍ते दिले आहेत. तुम्हाला वैयक्‍तिक बायबल अभ्यास आणखी चांगल्या प्रकारे करता यावा म्हणून यात बऱ्‍याच आकृत्या दिल्या आहेत आणि एखाद्या ठिकाणाचे कंप्युटरच्या सहाय्याने तयार केलेली चित्रंही आहेत. तसंच, यात इतर बरीच वैशिष्ट्यं आहेत.

बायबलमधल्या ठिकाणांच्या नकाशांमुळे तुम्हाला पुढील गोष्टी समजायला मदत होईल

  • अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांनी केलेला प्रवास

  • इस्राएली लोकांनी इजिप्त ते वचन दिलेल्या देशापर्यंत केलेल्या प्रवासाचा मार्ग

  • इस्राएल देश आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या शत्रू राष्ट्रंचं क्षेत्र

  • सेवाकार्यासाठी येशूने वेगवेगळ्या ठिकाणी केलेला प्रवास

  • बॅबिलॉन, ग्रीस आणि रोम यांसारख्या राज्यांचं साम्राज्य

बायबलमधल्या ठिकाणांचे नकाशे तुम्ही वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी  वर मिळवू शकता.