व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही सगळ्या प्रकारच्या लोकांना मदत कराल का; मग ते कोणत्याही वयाचे, देशाचे किंवा धर्माचे असले तरीही?

जे गरजवंतांना मदत करतात त्यांना अनेक आशीर्वाद मिळतात

जे गरजवंतांना मदत करतात त्यांना अनेक आशीर्वाद मिळतात

आज जगभरात असे अनेक जण आहेत ज्यांना अन्‍न, वस्त्र, निवारा या मूलभूत गोष्टीही मिळत नाहीत. तर असेही काही जण आहेत ज्यांना आपलं भविष्य अंधकारमय वाटतं. अशा गरजू लोकांना आपण मदत करावी अशी देवाची इच्छा आहे. आपण जर त्यांना मदत केली तर देव आपल्याला अनेक आशीर्वाद देईल.

पवित्र शास्त्रात काय सांगितलं आहे?

“जो दरिद्र्‌यावर दया करतो तो परमेश्‍वराला उसने देतो; त्याच्या सत्कृत्याची फेड तो करेल.”—नीतिसूत्रे १९:१७.

आपण गरजवंतांना मदत कशी करू शकतो?

हे समजावण्यासाठी येशूने एका माणसाची गोष्ट सांगितली. एकदा काही लुटारूंनी त्या माणसावर हल्ला केला. आणि त्याला अर्धमेल्या अवस्थेत सोडून ते पळून गेले. (लूक १०:२९-३७) त्या रस्त्याने जाणाऱ्‍या एका भल्या माणसाने त्या जखमी माणसाला पाहिलं आणि त्याला मदत केली. खरंतर हा भला माणूस त्याला ओळखतही नव्हता. शिवाय, तो वेगळ्या जातीचा होता. पण तरीसुद्धा तो त्याच्या मदतीला धावून आला.

या दयाळू माणसाने त्याच्या जखमांवर मलमपट्टी केली. इतकंच नाही, तर त्याने त्याच्या उपचारासाठी पैसे देऊन त्याची काळजी घेण्याची व्यवस्थाही केली.

या गोष्टीतून येशूला काय शिकवायचं होतं? हेच की ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना आपण जमेल त्या मार्गांनी मदत केली पाहिजे. (नीतिसूत्रे १४:३१) पवित्र शास्त्रात असं सांगितलं आहे की देव लवकरच गरिबीचा आणि दुःखाचा अंत करणार आहे. पण कदाचित आपल्याला प्रश्‍न पडेल की, देव हे नेमकं कधी आणि कसं करणार आहे? आपल्याला घडवणारा देव येणाऱ्‍या भविष्यात आपल्याला कोणकोणते आशीर्वाद देईल, यांबद्दल आपण पुढच्या लेखात पाहू या.