पाठ ६
मेलेल्या लोकांसाठी काय आशा आहे?
१. मेलेल्या लोकांबद्दल कोणती आनंदाची बातमी आहे?
येशू यरुशलेमजवळ असलेल्या बेथानी शहरात आला, तेव्हा त्याचा मित्र लाजर याला मरून चार दिवस झाले होते. लाजरच्या बहिणी मार्था आणि मरीया यांच्यासोबत येशू त्या गुहेजवळ गेला, जिथे लाजरचा मृतदेह ठेवला होता. काही वेळातच तिथे पुष्कळ लोक जमले. आणि त्या सगळ्यांच्या देखत येशूने लाजरला पुन्हा जिवंत केलं. हे पाहून मार्था आणि मरीयाला किती आनंद झाला असेल, याची तुम्ही कल्पना करू शकता का?—योहान ११:२१-२४, ३८-४४ वाचा.
मेलेल्या लोकांबद्दल असलेली आनंदाची बातमी मार्थाला आधीच माहीत होती. तिला माहीत होतं, की यहोवा मेलेल्या लोकांचं पुनरुत्थान करेल, म्हणजेच त्यांना या पृथ्वीवर राहण्यासाठी पुन्हा जिवंत करेल.—ईयोब १४:१४, १५ वाचा.
२. मेलेले लोक कोणत्या स्थितीत असतात?
देवाने माणसाला मातीपासून बनवलं आहे. (उत्पत्ती २:७; ३:१९) आपल्या शरीरात कोणताही अमर आत्मा नसतो. आपण मरतो तेव्हा आपला मेंदूही काम करायचं बंद करतो. त्यामुळे मेल्यावर आपण कोणताही विचार करू शकत नाही. म्हणूनच लाजरने मेल्यानंतर त्याच्यासोबत काय झालं, याबद्दल काहीच सांगितलं नाही. कारण मेलेल्या लोकांना कशाचीच जाणीव नसते.—स्तोत्र १४६:४; उपदेशक ९:५, ६, १० वाचा.
देव लोकांना मेल्यानंतर नरकात यातना भोगायला लावतो का? बायबल सांगतं, की मेलेल्या लोकांना कोणतीच जाणीव नसते. त्यामुळे देव लोकांना नरकात यातना भोगायला लावतो, ही देवाला बदनाम करणारी एक खोटी यिर्मया ७:३१ वाचा.
शिकवण आहे. खरंतर, कोणाला आगीत यातना देण्याच्या कल्पनेचीही देवाला घृणा वाटते.—मृत लोकांची काय अवस्था आहे? हा व्हिडिओ पाहा
३. मेलेले लोक आपल्याशी बोलू शकतात का?
मेलेले लोक ना बोलू शकतात, ना ऐकू शकतात. (स्तोत्र ११५:१७) पण काही स्वर्गदूत दुष्ट आहेत आणि ते मेलेल्या व्यक्तीच्या आवाजात लोकांशी बोलू शकतात. (२ पेत्र २:४) पण यहोवा आपल्याला मेलेल्या व्यक्तीशी बोलायचा प्रयत्न करायची मनाई करतो.—अनुवाद १८:१०, ११ वाचा.
४. कोणाला पुन्हा जिवंत केलं जाईल?
आज मेलेल्या स्थितीत असलेल्या लाखो-करोडो लोकांना पृथ्वीवर जगण्यासाठी पुन्हा जिवंत केलं जाईल. यांमध्ये असेही लोक असतील, ज्यांना देवाबद्दल काहीही माहीत नव्हतं आणि जे वाईट गोष्टी करायचे.—लूक २३:४३; प्रेषितांची कार्यं २४:१५ वाचा.
ज्यांना पुन्हा जिवंत केलं जाईल, त्यांना देवाबद्दलचं सत्य जाणून घेण्याची संधी मिळेल. तसंच, येशूच्या आज्ञा पाळून त्याच्यावर आपला विश्वास आहे, हे दाखवण्याचीही त्यांना संधी मिळेल. (प्रकटीकरण २०:११-१३) पुन्हा जिवंत झालेल्या लोकांपैकी जे चांगली कामं करतील, ते सदासर्वकाळ पृथ्वीवर आनंदाने राहू शकतील.—योहान ५:२८, २९ वाचा.
५. पुनरुत्थानाबद्दल जाणून घेतल्यामुळे आपल्याला यहोवाबद्दल काय समजतं?
मेल्यानंतर आपल्याला पुन्हा जिवंत होण्याची आशा मिळावी, म्हणून यहोवाने त्याच्या मुलाला आपल्यासाठी त्याचं जीवन अर्पण करायला पृथ्वीवर पाठवलं. पुनरुत्थानाची आशा देऊन यहोवाने आपल्यावर अपार कृपा केली आहे आणि यामुळे आपल्याला कळतं की त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे! जेव्हा मेलेले लोक पुन्हा जिवंत होतील, तेव्हा तुम्हाला सगळ्यात आधी कोणाला भेटायला आवडेल?—योहान ३:१६; रोमकर ६:२३ वाचा.