इब्री लोकांना पत्र २:१-१८

  • नेहमीपेक्षा जास्त लक्ष द्या (१-४)

  • सर्व गोष्टी येशूच्या स्वाधीन (५-९)

  • येशू आणि त्याचे बांधव (१०-१८)

    • त्यांच्या तारणाचा मुख्य प्रतिनिधी (१०)

    • दयाळू महायाजक (१७)

 म्हणूनच, ऐकलेल्या गोष्टींकडे आपण नेहमीपेक्षा जास्त लक्ष दिलं पाहिजे,+ म्हणजे आपण कधीही वाहवत जाणार नाही.+ २  कारण स्वर्गदूतांद्वारे बोललेलं वचन+ खातरीलायक ठरलं, आणि त्याविरुद्ध केलेल्या प्रत्येक अपराधाची आणि उल्लंघनाची शिक्षा न्यायाप्रमाणे देण्यात आली.+ ३  मग, इतक्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केलं, तर आपण शिक्षेपासून कसं वाचू?+ कारण, या तारणाचा संदेश सांगण्याची सुरुवात आपल्या प्रभूने केली+ आणि ज्यांनी त्याचं ऐकलं त्यांनी आपल्याला त्याची खातरी पटवून दिली. ४  शिवाय देवसुद्धा चिन्हं, चमत्कार आणि वेगवेगळी अद्‌भुत कार्यं घडवून आणण्याद्वारे,+ तसंच, त्याच्या इच्छेप्रमाणे पवित्र शक्‍तीची* दानं वाटून देण्याद्वारे साक्ष देण्यात सहभागी झाला.+ ५  कारण ज्या येणाऱ्‍या जगाबद्दल* आपण बोलत आहोत, ते त्याने स्वर्गदूतांच्या स्वाधीन केलेलं नाही.+ ६  पण एका ठिकाणी एका साक्षीदाराने असं म्हटलं आहे: “माणूस काय आहे की तू त्याला आठवणीत ठेवावं? आणि मानव काय आहे की तू त्याची काळजी घ्यावी?+ ७  तू त्याला स्वर्गदूतांपेक्षा काहीसं कमी बनवलंस; तू त्याला गौरवाचा आणि सन्मानाचा मुकुट घातलास आणि तुझ्या हातांच्या कार्यांवर त्याला नेमलंस. ८  तू सर्व गोष्टी त्याच्या पायांखाली ठेवल्या.”+ सगळ्या गोष्टी त्याच्या स्वाधीन करण्याद्वारे,+ त्याच्या अधीन नाही अशी कोणतीही गोष्ट देवाने ठेवली नाही.+ अर्थात, आपल्याला सध्यातरी सर्व गोष्टी त्याच्या स्वाधीन असल्याचं दिसत नाही.+ ९  पण ज्याला स्वर्गदूतांपेक्षा काहीसं कमी करण्यात आलं होतं,+ त्या येशूला आता आपण गौरवाचा आणि सन्मानाचा मुकुट घातलेला पाहतो. कारण त्याने मरण सोसलं+ आणि त्याद्वारे देवाच्या अपार कृपेमुळे सर्वांसाठी मृत्यूचा अनुभव घेतला.+ १०  सर्व गोष्टी देवाच्या गौरवासाठी आहेत आणि त्या त्याच्याद्वारे अस्तित्वात आहेत. म्हणून पुष्कळ मुलांचा गौरव होण्यासाठी+ त्यांच्या मुख्य प्रतिनिधीला त्याने दुःख सोसू द्यावं, हे योग्य होतं.+ आणि या मुख्य प्रतिनिधीद्वारे देव त्यांचं तारण करतो.+ ११  पवित्र करणारा आणि ज्यांना पवित्र करण्यात आलं+ तेसुद्धा एकाच पित्यापासून आहेत,+ आणि म्हणूनच त्यांना भाऊ म्हणण्याची त्याला लाज वाटत नाही.+ १२  उदाहरणार्थ, तो म्हणतो, “मी आपल्या भावांसमोर तुझं नाव घोषित करीन; मंडळीत गीत गाऊन मी तुझी स्तुती करीन.”+ १३  पुन्हा तो म्हणतो, “मी त्याच्यावर भरवसा ठेवीन.”+ तसंच, “पाहा! मी आणि यहोवाने* मला दिलेली लहान मुलं.”+ १४  त्यामुळे ही “लहान मुलं” जशी हाडामांसाची आहेत तसाच तोसुद्धा हाडामांसाचा झाला.+ हे यासाठी, की ज्याच्याजवळ मृत्यू घडवून आणण्याची ताकद आहे,+ त्याला, म्हणजेच सैतानाला*+ त्याने आपल्या मरणाद्वारे नाहीसं करावं. १५  तसंच, मरणाच्या भीतीने ज्यांना आयुष्यभर दास करून ठेवलं होतं, त्या सगळ्यांना त्याने स्वतंत्र करावं.*+ १६  कारण खरं पाहिलं, तर तो स्वर्गदूतांची नाही, तर अब्राहामच्या संततीची* मदत करत आहे.+ १७  म्हणूनच, त्याला सर्व बाबतींत आपल्या “भावांप्रमाणे” बनावं लागलं.+ हे यासाठी, की त्याने देवाच्या सेवेत एक दयाळू आणि विश्‍वासू महायाजक बनावं, तसंच लोकांच्या पापांसाठी+ प्रायश्‍चित्ताचं बलिदान अर्पण करावं.+ १८  त्याची परीक्षा होत असताना त्याने स्वतः दुःख सोसलं,+ त्यामुळे ज्यांची परीक्षा होत आहे त्यांची मदत करायला तो समर्थ आहे.+

तळटीपा

शब्दशः “मानववस्ती असलेल्या पृथ्वीबद्दल.”
अति. क५ पाहा.
शब्दशः “दियाबलाला.” म्हणजे, निंदा करणारा.
किंवा “सुटका करावी.”
शब्दशः “बीजाची.”