योहानला झालेलं प्रकटीकरण ३:१-२२
३ सार्दीस इथे असलेल्या मंडळीच्या दूताला लिही: ज्याच्याजवळ देवाच्या सात अदृश्य शक्ती* आहेत+ आणि सात तारे आहेत+ तो असं म्हणतो: ‘मला तुझी कार्यं माहीत आहेत. तू जिवंत आहेस असं नाव तुला आहे,* पण तू मेलेला आहेस.+
२ जागा हो+ आणि उरलेल्या ज्या गोष्टी मरायला टेकल्या आहेत त्यांना बळकट कर. कारण माझ्या देवासमोर तुझी कार्यं पूर्ण झालेली मला दिसून आली नाहीत.
३ म्हणून तू जे काही स्वीकारलं आणि जे काही ऐकलं ते आठवणीत असू दे* आणि त्याचं पालन करत राहा आणि पश्चात्ताप कर.+ जर तू जागा झाला नाहीस, तर मी नक्कीच चोराप्रमाणे येईन+ आणि मी कोणत्या वेळेला येईन हे तुला कळणारसुद्धा नाही.+
४ तरीपण, सार्दीस इथे तुझ्याकडे असे काही जण* आहेत ज्यांनी आपली वस्त्रं दूषित केली नाहीत.+ ते माझ्यासोबत पांढरी वस्त्रं घालून चालतील+ कारण ते यासाठी योग्य आहेत.
५ जो विजय मिळवेल+ तो पांढरी वस्त्रं घालेल+ आणि मी त्याचं नाव जीवनाच्या पुस्तकातून कधीही पुसून* टाकणार नाही.+ तर, माझ्या पित्यासमोर आणि त्याच्या स्वर्गदूतांसमोर मी त्याच्या नावाचा स्वीकार करीन.+
६ पवित्र शक्ती मंडळ्यांना काय म्हणते हे ज्याला कान आहे त्याने ऐकावं.’
७ फिलदेल्फिया इथे असलेल्या मंडळीच्या दूताला लिही: जो पवित्र आहे,+ जो खरा आहे,+ ज्याच्याजवळ दावीदची किल्ली आहे,+ जो अशा रितीने उघडतो की कोणी बंद करू शकत नाही आणि अशा रितीने बंद करतो की कोणी उघडू शकत नाही, तो असं म्हणतो:
८ ‘मला तुझी कार्यं माहीत आहेत. पाहा! मी तुझ्यापुढे एक असं दार उघडलं आहे,+ जे कोणीही बंद करू शकत नाही. मला माहीत आहे, की तुझ्याजवळ थोडीच शक्ती आहे, पण तरी तू माझ्या वचनाचं पालन केलंस आणि माझं नाव नाकारलं नाहीस.
९ पाहा! सैतानाच्या सभेचे जे लोक यहुदी नसताना खोटं बोलून स्वतःला यहुदी म्हणवतात,+ त्यांना मी तुझ्याकडे येऊन तुझ्या पाया पडायला* लावीन. आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे हे मी त्यांना दाखवून देईन.
१० माझ्या धीराबद्दलचं वचन तू पाळल्यामुळे,*+ पृथ्वीवर राहणाऱ्यांची परीक्षा घेण्यासाठी जो परीक्षेचा काळ संपूर्ण पृथ्वीवर येणार आहे त्यापासून मी तुला वाचवीन.+
११ मी लवकरच येत आहे.+ जे तुझ्याजवळ आहे त्याला घट्ट धरून ठेव, म्हणजे कोणीही तुझा मुकुट तुझ्याकडून काढून घेणार नाही.+
१२ जो विजय मिळवेल त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातला एक स्तंभ बनवीन आणि तो कधीही तिथून बाहेर जाणार नाही. मी माझ्या देवाचं नाव+ आणि माझ्या देवाच्या शहराचं नाव, म्हणजे माझ्या देवाकडून स्वर्गातून उतरणाऱ्या नवीन यरुशलेमचं नाव+ आणि माझं स्वतःचं नवीन नाव त्याच्यावर लिहीन.+
१३ पवित्र शक्ती मंडळ्यांना काय म्हणते हे ज्याला कान आहे त्याने ऐकावं.’
१४ लावदिकीया इथे असलेल्या मंडळीच्या+ दूताला लिही: जो आमेन,+ जो विश्वासू आणि खरा+ साक्षीदार,+ जो देवाच्या निर्मितीची सुरुवात,+ तो असं म्हणतो:
१५ ‘मला तुझी कार्यं माहीत आहेत, की तू गरम किंवा थंडही नाहीस. तू एकतर गरम किंवा थंड असायला हवं होतं.
१६ पण तू गरम+ किंवा थंडही+ नाहीस, तर कोमट आहेस म्हणून मी तुला ओकून टाकणार आहे.
१७ तू म्हणतोस, “मी श्रीमंत आहे+ आणि मी धनसंपत्ती मिळवली आहे आणि मला कशाचीही गरज नाही,” पण तुला याची जाणीव नाही की तू दुःखी, दयनीय, दरिद्री, आंधळा आणि उघडावाघडा आहेस.
१८ म्हणून मी तुला असा सल्ला देतो, की तू माझ्याकडून आगीत शुद्ध केलेलं सोनं विकत घ्यावं, म्हणजे तू श्रीमंत होशील. तसंच, उघडा असल्यामुळे तुझी लाज लोकांना दिसू नये,+ म्हणून तू माझ्याकडून शुभ्र कपडे विकत घेऊन ते घालावेत. आणि तुला दृष्टी यावी म्हणून+ डोळ्यांत घालण्यासाठी तू माझ्याकडून अंजन+ विकत घ्यावं.
१९ ज्यांच्याबद्दल मला जिव्हाळा आहे त्या सर्वांना मी सुधारतो आणि त्यांचं ताडन करतो.+ म्हणून आवेशी हो आणि पश्चात्ताप कर.+
२० पाहा! मी दारावर उभा आहे आणि दार ठोठावत आहे. जर कोणी माझा आवाज ऐकून दार उघडलं, तर मी त्याच्या घरात जाईन आणि आम्ही सोबत मिळून संध्याकाळचं जेवण करू.
२१ जो विजय मिळवेल+ त्याला मी माझ्या राजासनावर बसण्याचा अधिकार देईन.+ कारण, मीसुद्धा विजय मिळवला आहे आणि माझ्या पित्यासोबत त्याच्या राजासनावर बसलो आहे.+
२२ पवित्र शक्ती मंडळ्यांना काय म्हणते हे ज्याला कान आहे त्याने ऐकावं.’”
तळटीपा
^ किंवा “अशी तुझी ख्याती आहे.”
^ ग्रीक न्यूमा. शब्दार्थसूचीत “रूआख; न्यूमा” पाहा.
^ किंवा “त्याची जाणीव ठेव.”
^ शब्दशः “अशी काही नावं.”
^ किंवा “खोडून.”
^ किंवा “नमन करायला.”
^ किंवा कदाचित, “धीर दाखवण्याच्या बाबतीत माझ्या उदाहरणाचं तू अनुकरण केल्यामुळे.”