योहानला झालेलं प्रकटीकरण ५:१-१४

  • सात शिक्के मारलेली गुंडाळी (१-५)

  • कोकरा गुंडाळी घेतो (६-८)

  • शिक्के फोडायला कोकरा योग्य ठरला (९-१४)

 जो राजासनावर बसलेला होता+ त्याच्या उजव्या हातात मला एक गुंडाळी दिसली. तिच्यावर दोन्ही बाजूला* लिहिलेलं होतं आणि तिला सात शिक्के मारून बंद करण्यात आलं होतं. २  मग, मला एक शक्‍तिशाली स्वर्गदूत दिसला. तो अशी घोषणा करत होता: “गुंडाळीवरचे शिक्के फोडून ती उघडायला कोण योग्य आहे?” ३  पण स्वर्गात किंवा पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही ती गुंडाळी उघडायला किंवा तिच्यात काय आहे हे पाहायला योग्य ठरला नाही. ४  तेव्हा मी खूप रडू लागलो, कारण गुंडाळी उघडायला किंवा तिच्यात काय आहे हे पाहायला योग्य असा कोणीही सापडला नाही. ५  पण वडिलांपैकी एक जण मला म्हणाला: “थांब, रडू नकोस. पाहा! जो यहूदाच्या वंशातला सिंह+ आणि दावीदचं+ मूळ,+ तो गुंडाळीचे सात शिक्के फोडण्यासाठी आणि ती उघडण्यासाठी विजयी ठरला आहे.”+ ६  राजासनाच्या आणि त्या चार जिवंत प्राण्यांच्या मधोमध आणि वडिलांच्या मधोमध+ मला एक कोकरा+ दिसला. त्याचा जणू काय वध झाला होता.+ त्याला सात शिंगं आणि सात डोळे होते आणि ते डोळे संपूर्ण पृथ्वीवर पाठवण्यात आलेल्या देवाच्या सात अदृश्‍य शक्‍ती* आहेत.+ ७  तो कोकरा लगेच पुढे आला आणि जो राजासनावर बसलेला होता+ त्याच्या उजव्या हातातून त्याने ती गुंडाळी घेतली. ८  त्याने गुंडाळी घेतली, तेव्हा ते चार जिवंत प्राणी आणि २४ वडील+ यांनी कोकऱ्‍याला नमन केलं. त्या प्रत्येकाजवळ एक वीणा* आणि धूपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या. (धूप हा पवित्र जनांच्या प्रार्थनांना सूचित करतो.)+ ९  आणि ते एक नवीन गीत गातात+ आणि म्हणतात: “गुंडाळी घेऊन तिचे शिक्के फोडायला तू योग्य आहेस. कारण तुझा वध करण्यात आला आणि तुझ्या रक्‍ताने तू प्रत्येक वंश, भाषा, लोकसमूह आणि राष्ट्र यांतून देवासाठी लोकांना विकत घेतलं आहेस.+ १०  तू त्यांना आमच्या देवासाठी एक राज्य+ आणि याजक असं केलं+ आणि ते राजे या नात्याने पृथ्वीवर राज्य करतील.”+ ११  मग मी पाहिलं तेव्हा राजासन, चार जिवंत प्राणी आणि वडील यांच्याभोवती मला पुष्कळ स्वर्गदूतांचा आवाज ऐकू आला. त्यांची संख्या हजारो-लाखो इतकी होती.+ १२  आणि ते मोठ्या आवाजात असं म्हणत होते: “ज्या कोकऱ्‍याचा वध झाला होता,+ तो सामर्थ्य, वैभव, बुद्धी, शक्‍ती, सन्मान, गौरव आणि स्तुती मिळण्यासाठी योग्य आहे.”+ १३  आणि मी स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या खाली,+ तसंच समुद्रावर असलेल्या प्रत्येक प्राण्याला, सर्वांना असं म्हणताना ऐकलं: “जो राजासनावर बसला आहे+ त्याला आणि कोकऱ्‍याला+ सदासर्वकाळ स्तुती, सन्मान,+ गौरव आणि सामर्थ्य मिळो.”+ १४  तेव्हा ते चार जिवंत प्राणी म्हणाले: “आमेन!” आणि वडिलांनी गुडघे टेकून नमन केलं.

तळटीपा

शब्दशः “आत आणि मागच्या बाजूला.”
ग्रीक न्यूमा. शब्दार्थसूचीत “रूआख; न्यूमा” पाहा.