मीखा ४:१-१३
४ शेवटच्या दिवसांत,*यहोवाच्या मंदिराचा पर्वत+ इतर पर्वतांहून उंच होईल,तो भक्कमपणे स्थापन केला जाईल.
तो सर्व टेकड्यांहून उंच केला जाईल,आणि देशोदेशीचे लोक प्रवाहासारखे त्याच्याकडे येतील.+
२ आणि बऱ्याच राष्ट्रांचे लोक येतील आणि म्हणतील:
“चला, आपण यहोवाच्या पर्वतावरआणि याकोबच्या देवाच्या मंदिराकडे जाऊ.+
तो आपल्याला त्याचे मार्ग शिकवेल,आणि त्याने दाखवलेल्या वाटेने आपण चालू.”
कारण सीयोनमधून नियम,*आणि यरुशलेममधून यहोवाचा शब्द निघेल.
३ तो पुष्कळ राष्ट्रांचा न्याय करेल+आणि दूरदूरच्या शक्तिशाली राष्ट्रांचे वाद मिटवेल.*
ते आपल्या तलवारी ठोकून नांगरांचे फाळ* बनवतीलआणि आपल्या भाल्यांपासून कोयते बनवतील.+
यापुढे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राविरुद्ध तलवार उचलणार नाही,आणि ते युद्ध करायलाही शिकणार नाहीत.+
४ त्यांच्यातला प्रत्येक जण आपल्या द्राक्षवेलाखाली आणि आपल्या अंजिराच्या झाडाखाली बसेल,*+कोणीही त्यांना घाबरवणार नाही,+कारण सैन्यांचा देव यहोवा हे बोलला आहे.
५ सर्व राष्ट्रांचे लोक आपापल्या देवाच्या नावाने चालतील,पण आम्ही तर सदासर्वकाळ आमच्या देवाच्या, यहोवाच्या नावाने चालू.+
६ यहोवा म्हणतो, “जे* लंगडत होते,त्यांना मी त्या दिवशी गोळा करीन,आणि ज्यांची पांगापांग झाली होती,तसंच, ज्यांच्याशी मी कठोरपणे वागलो होतो, त्यांनाही मी एकत्र करीन.+
७ जे* लंगडत होते त्यांच्यातल्या उरलेल्यांना मी वाचवीन,+आणि ज्यांना दूर पाठवण्यात आलं होतं, त्यांचं मी एक मोठं राष्ट्र बनवीन;+आतापासून सदासर्वकाळ,यहोवा सीयोन पर्वतावर राजा म्हणून त्यांच्यावर राज्य करेल.
८ हे कळपाच्या बुरुजा,सीयोनच्या मुलीच्या डोंगरा,+पहिली* सत्ता येईल, हो, ती पुन्हा तुझ्याकडे येईल,+यरुशलेमच्या मुलीचं राज्य पुन्हा तिला मिळेल.+
९ तू अशी मोठमोठ्याने का ओरडत आहेस?
तुला राजा नाही का?
की तुला सल्ला देणारा मेलाय?
म्हणूनच तुला जन्म देणाऱ्या स्त्रीसारख्या कळा येत आहेत का?+
१० हे सीयोनच्या मुली, जन्म देणाऱ्या स्त्रीसारखी,तू अशीच तळमळत आणि कण्हत राहा,कारण आतापासून तू शहरात नाही, तर रानात राहशील.
तू पार बाबेलपर्यंत जाशील,+आणि तिथून तुला वाचवलं जाईल;+तिथे यहोवा तुला तुझ्या शत्रूंच्या हातून परत विकत घेईल.+
११ बरीच राष्ट्रं तुझ्याविरुद्ध एकत्र येतील;ती म्हणतील, ‘तिला दूषित होऊ दे,आमच्या डोळ्यांदेखत सीयोनसोबत असं घडू दे.’
१२ पण यहोवाचे विचार त्यांना माहीत नाहीत,त्याचा उद्देश त्यांना कळत नाही;कारण तो त्यांना नुकत्याच कापलेल्या धान्याच्या पेंढ्यांसारखा खळ्यात* गोळा करेल.
१३ हे सीयोनच्या मुली, ऊठ आणि मळणी कर;+कारण मी तुझी शिंगं लोखंडाची,आणि तुझे खूर तांब्याचे करीन.
तू पुष्कळ राष्ट्रांचा चुराडा करशील.+
त्यांची बेइमानीची कमाई तू यहोवाला अर्पण करशील;आणि त्यांची संपत्ती तू संपूर्ण पृथ्वीच्या खऱ्या प्रभूला अर्पण करशील.”+
तळटीपा
^ किंवा “काळाच्या शेवटच्या भागात.”
^ किंवा “शिक्षण.”
^ किंवा “चुकीच्या गोष्टी सुधारेल.”
^ म्हणजे, माती सुटी करण्यासाठी वापरलं जाणारं लोखंडी अवजार.
^ किंवा “राहील.”
^ शब्दशः “जी.”
^ शब्दशः “जी.”
^ किंवा “पूर्वीची.”
^ शब्दार्थसूची पाहा.