प्रश्न १
देव कोण आहे?
“लोकांना कळू दे, की तुझं नाव यहोवा आहे आणि या संपूर्ण पृथ्वीवर फक्त तूच सर्वोच्च देव आहेस.”
“यहोवाच देव आहे हे ओळखा. त्यानेच आपल्याला बनवलं आणि आपण त्याचेच आहोत.”
“मी यहोवा आहे. हे माझं नाव आहे; दुसऱ्या कोणालाही मी माझा गौरव मिळू देणार नाही, माझी प्रशंसा मी मूर्तींना मिळू देणार नाही.”
“जो कोणी यहोवाचं नाव घेऊन त्याला हाक मारेल, त्याला वाचवलं जाईल.”
“अर्थात, प्रत्येक घर कोणी ना कोणी बांधलेलं असतं. पण ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या तो देव आहे.”
“आपले डोळे वर करा आणि आकाशाकडे बघा. या सगळ्या ताऱ्यांना कोणी बनवलं? जो त्यांच्या सैन्याची मोजणी करून त्यांचं नेतृत्व करतो; त्यांच्यातल्या प्रत्येकाला जो नावाने बोलावतो, त्यानेच त्यांना बनवलं आहे. त्याच्या प्रचंड आणि अफाट शक्तीमुळे, त्याच्या विस्मयकारक ताकदीमुळे, त्यांच्यातला एकही गैरहजर राहत नाही.”